सृजन हा सृष्टीचा अंगभूत गुणधर्म आहे.
ते गूढ वैज्ञानिकांनाही उलगडलेले नाही. कोणत्याही नवतेतील मूलभूतता सृजनाच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
प्रतिभा ही दैवी देणगी मानली जाते.
परंतु आज जगभर सृजनात्मक लेखनाचे प्रशिक्षण देणारे अभ्यासक्रम राबवले जात आहेत. प्रतिभेला तंत्राची जोड आवश्यक आहे, असेही आज समजले
जात आहे.
ह्या पार्श्वभूमीवर डॉ. आनंद पाटील यांचा हा ग्रंथ महत्त्वपूर्ण ठरेल. मराठीत ह्या विषयावर फारसे ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळे मराठीचे अभ्यासक,रसिक याचे स्वागत करतील यात शंका नाही.
हा महाराष्ट्र शासनाचा समीक्षेसाठीचा श्री. के. क्षीरसागर पुरस्कार प्राप्त ग्रंथ महाराष्ट्रातील व गोव्यातील सर्व विद्यापीठात ‘सृजनात्मक लेखन’ व वृत्तपत्र विद्याविभागातील अभ्यासक्रमात पाठ्यपुस्तक म्हणून नेमला गेला आहे.