वस्तू वर, प्रतिमा खाली हे कसे होत असेल बरं? पडलाय कधी प्रश्न ? पाऊस किती पडला हे आपल्याला मोजता येतं माहितीये तुम्हाला? नाही ? मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे… विज्ञान हा खरं म्हणजे जितका पुस्तकातून शिकण्याचा विषय आहे तितकाच तो प्रत्यक्ष प्रयोगातून किंवा प्रात्यक्षिकांद्वारे शिकविण्याचा आणि शिकण्याचाही विषय आहे. प्रयोगांमधून आपल्याला निसर्गातल्या अनेक संकल्पना उलगडतात. विज्ञानातले वेगवेगळे सिद्धांत, नियम, तत्त्वे या गोष्टी विद्यार्थ्यांना समजावून सांगायच्या असतील तर त्यासाठी प्रयोग करणे व करवून घेणे वा प्रात्यक्षिक दाखविणे आवश्यक असते. प्रयोगाच्या या पुस्तकात तुम्हाला वेगवेगळे प्रयोग कसे करावेत ते रंजक पद्धतीने समजेल आणि विज्ञान विषयातली तुमची रुची वाढेल यात शंका नाही. केवळ विद्यार्थीच नव्हे तर विज्ञानाची आवड असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हे प्रयोग सहज करता येण्याजोगे आहेत. तेव्हा साध्या साध्या वस्तूंच्या माध्यमातून घरबसल्या विज्ञानाचे रंजक प्रयोग करा आणि तुमच्या हुशारीने इतरांना चकित करा… विज्ञानाच्या प्रयोगांचं हे पुस्तक तुम्हाला जीनियस बनवेल… चला तर मग… जाणून घेऊया. सोप्या पद्धतीने विज्ञान शिकविणारे प्रयोग…