देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते – * क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं? * रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं? ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं? * NEFT/ RTGS, UPI इत्यादी सेवा कशा वापरायच्या? * इंटरनेट बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या, त्या कशा वापरायच्या? * सशक्त पासवर्डस कसे तयार करायचे? * ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे? * लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी कोणती साधनं घ्यायची? * सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादीया पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !