संभाजी सोमा कदम. ज्योत्स्ना दत्तात्रेय जोशी. दोघांच्या वयांत पंचवीस वर्षांचं अंतर. ते प्राध्यापक, ती विद्यार्थिनी. त्यांची आर्थिक स्थिती बेताची, ती सुखवस्तू. पण यांतले कुठलेच बांध या सर्जनशील कलाकारांना एकत्र येण्यापासून रोखू शकले नाहीत. मग सुरू झाला त्यांच्या मनस्वी रंगीत चित्रांइतकाच धुंद सहजीवनाचा प्रवास! राजाच्या मृत्यूनं ताटातूट झालेल्या राणीनं मग उभं केलं हे उन्मुक्त सहजीवनाचं शब्दचित्र !