बालकांवर आपण जसजसे संस्कार करू, तसतशी त्यांची सर्वांगानेवाढ होत असते. त्यांच्या उत्तम शारीरिक वाढीसाठी सकस आहाराचीआवश्यकता असते, त्याचबरोबर भावनिक, मानसिक आणि बौद्धिकविकासासाठी उत्तम संस्कारक्षम वाचन साहित्याची नितांतआवश्यकता असते. मुलांच्या वाढत्या वयाबरोबर हा उत्तम खजिना,त्यांची वाचनाची आवड आणि रुची समृद्ध करण्यास मदत करील.भारतीय १२ भाषांतील १३० संस्कार गोष्टींचा हा खजिना.भारतीय बारा भाषांतील श्रेष्ठ बालकथा आणि त्यांचे मराठीअनुवादक आहेत.आसामी : शंकर कऱ्हाडे,उर्दू : श्याम कुरळे,उडिया : सरिता वैद्य आणि बाबूराव शिंदे,कन्नड : राजाभाऊ मंगळवेढेकर आणि धों. वे. जोगी,गुजराथी : लीला शिंदे, मधुकर प्रधान आणि सुनीता प्रधान,तमिळ : दि. वि. जोशी,तेलुगु : कल्याण इनामदार,पंजाबी : शंकर सारडा,बंगाली : विलास गिते आणि धुण्डिराज कहाळेकर,मल्याळी : अरुण देशपांडे,हिंदी : सुरेश सावंत आणि दत्ता डांगे,मराठी : संपादन : बाबा भांडया श्रेष्ठ भारतीय बालकथांचा अनुवाद म्हणजे बालसाहित्यवाचकांसाठी उत्कृष्ट मेजवानीच आहे.