Skip to product information
1 of 2

Shreemadbhagwat Kamalparag (श्रीमद्भागवत कमलप्रयाग ) by Suman Sarnaik

Description

वेदांत हे भारतीय विचारांचे गौरीशंकर - शिखर होय! हे वेदांतशास्त्र श्रीमद्भागवतात अत्यंत रसाळपणे निरुपित केले गेले आहे. 'सर्व वेदेतिहासांना सारं सारं समुद्धदृतम्' हे भागवताचे स्वरूप आहे. वेदांताचे परब्रह्मतत्त्व श्रीमद् भागवतात माधुर्याने ओथंबलेले अनुभवास येते. याचा विशेष प्रत्यय दशमस्कंधात येतो. श्रीकृष्ण लीलांनी भरलेला दशमस्कंध सर्व रसांचा महासागर आहे आणि या सागरात असंख्य दार्शनिक सिद्धांतरत्नेही दडलेली आहेत.या सर्वांत महत्त्वाच्या स्कंधावर आदरणीय सुश्री सुमनताई सरनाईक यांनी सविस्तर सानुवाद मराठी रसग्रहण या ग्रंथात निवेदित केले आहे. या ग्रंथपरिचयाची उत्तम प्रस्तावना परमवैष्णव श्रद्धेय श्री. वा. ना. उत्पात यांनी लिहिली असल्यामुळे विषय विस्ताराची आवश्यकता नाही. त्यांच्या सर्व प्रतिपादनाशी मीही सहमत आहे.सुश्री. सुमनताईंची भावधारा श्री ज्ञानदेव व शुकदेव या दोन तटांच्या मधून वाहत असल्यामुळे तत्त्वनिष्ठा व लालित्य या दोन्ही गोष्टी त्यांच्या लेखनात सहज गुंफल्या गेल्या. परमपूज्य स्वामी श्री वरदानंद भारतींचा सहवास व कृपाशीर्वाद, विपुल श्रवण व चौफेर व्यासंग यामुळे त्यांच्या लेखाला धार आली आहे. स्वतःच्या वैयक्तिक साधनेने भावमयताही सहज साधली आहे. त्यांची ही गुणसंपदा अशीच वर्धिष्णु राहो व ग्रंथावलोकनाने या ग्रंथाचे वाचकही धन्य होवोत अशी श्रीचरणी प्रार्थना! नारायण नारायण इति.
Regular price
Rs. 500.00
Regular price
Sale price
Rs. 500.00
-0%
Shreemadbhagwat Kamalparag श्रीमद्भागवत कमलप्रयाग by Suman Sarnaik
Shreemadbhagwat Kamalparag (श्रीमद्भागवत कमलप्रयाग ) by Suman Sarnaik

Rs. 500.00

Recently viewed product

You may also like