Skip to product information
1 of 1

Shree maan by D B Kulkarni

Description

मराठीच्या ख्यातनाम प्राध्यापकांची नागपूरमधील परंपरा आपल्या सखोल व्यासंगाने, साक्षेपी लेखनाने व सौम्य-समतोल व्यक्तिमत्त्वाने उज्ज्वल करणारे प्राध्यापक म्हणजे श्री. मा. कुलकर्णी! त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सिद्ध केलेला ‘श्रीमा’न हा ग्रंथ हे जसे त्यांचे भावपूर्ण स्मरण आहे, तसेच त्यांनी केलेल्या वाङ्‌मयसेवेचे पर्यायलोचनही आहे. प्राचीन मराठी साहित्य, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, भारतीय संस्कृती, शिक्षण अशा विविध विषयांचा त्यांचा व्यासंग होता. रामायण, महाभारत, भागवत आदि ग्रंथांचा शुद्ध चिकित्सक दृष्टीने त्यांनी अभ्यास केला. तर्कशुद्ध विवेचन, निराग्रही पण सत्यनिष्ठ भूमिका, चिकित्सक पण विधायक दृष्टी आणि सुबोध, स्पष्ट, ओघवती, यथार्थदर्शी, सहजसुंदर शैली हे त्यांच्या लेखनाचे विशेष म्हणता येतील. ज्ञाने.रीची विविधांगांने, साक्षेपीवृत्तीने त्यांनी चिकित्सा केली असून त्यांचे हे सर्व ग्रंथ अभ्यासपूर्ण आहेत. प्रस्तुत ग्रंथातील काही लेखांमधून श्रीमांच्या साहित्यनिर्मितीची पृथगात्मता स्पष्ट होते तर काही लेखांमधून, त्यांच्या आठवणींतून त्यांचे व्यि.तमत्त्व व कर्तेपण स्पष्ट होते. श्रीमांचे अध्यक्षीय भाषण व पत्रे यांतून त्यांचे साक्षात दर्शन घडते. प्रसिद्धिपराङ्‌मुख व विनयशील विद्वानाच्या जीवनाचा व कार्याचा धावता आलेख रेखाटणारा ‘श्रीमा’न हा ग्रंथ संस्मरणीय व संग्राह्य झाला आहे. - विलास खोले
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Shree maan by D B Kulkarni
Shree maan by D B Kulkarni

Recently viewed product

You may also like