Skip to product information
1 of 1

Shouryagatha By Bhagwan Datar

Description

या कथा आहेत वीर जवानांच्या...या कथा आहेत त्यांच्या धाडसाच्या, निश्चयाच्या, जिद्दीच्या आणि वचनपूर्तीच्या ! सैनिक प्राणपणाने लढत असतो, तो देशाचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी ! या पुस्तकातल्या कथा `सैनिक नावाचं रसायन' कोणत्या मुशीतून घडतं,                       याची झलक तर आपल्याला देतातच पण त्याचबरोबर निश्चय आणि कटिबद्धता यांची प्रेरक कहाणीसुद्धा सांगतात.स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश सत्तेच्या बाजूने लढलेली युद्ध असोत किंवा स्वातंत्र्योत्तर काळात पाकिस्तान आणि चीनबरोबर आमने-सामने लढलेली युद्ध असोत... त्याचप्रमाणे प्रचंड उंचीवर लढलेलं  कारगील युद्ध असो किंवा शांतता काळातले संघर्ष असोत... प्रत्येक लढाईत,       प्रत्येक प्रसंगी वीरजवान जीवावर उदार होऊन लढल्यामुळेच भारताची सुरक्षा अबाधित राहिली. या सर्व युद्धांत दाखवलेल्या असामान्य शौर्यासाठी अनेक लष्करी अधिकारी व जवानांना आजवर विविध सन्मानाने गौरवण्यात आले आहे.  त्यापैकी काही वीरांच्या शौर्याची,                त्यांच्या नेमक्या कर्तृत्वाची ओळख या पुस्तकात तपशीलांसह व रोचकपणे करून दिली आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर, या आहेत असीम धैर्य आणि पराकोटीचं शौर्य दाखवणार्‍या वीरांच्या शौर्यगाथा !
Regular price
Rs. 200.00
Regular price
Sale price
Rs. 200.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Shouryagatha by Bhagwan Datar
Shouryagatha By Bhagwan Datar

Recently viewed product

You may also like