शेती आणि पशुपालन हे माणसाचे अगदी पुरातन काळापासून अस्तित्वात असलेले व्यवसाय. शेतीसंबंधीची निरीक्षणे आणि प्रयोग माणूस प्राचीन काळापासून करत आला आहे. भारतातही वैदिक कालखंडापासून अनेक ऋषिमुनींनी शेतीविषयक विविध विषयांना गवसणी घालणारी ग्रंथरचना केली. कृषिपराशर, वृक्षायुर्वेद, उपवनविनोद अशा अनेक बहुमोल ग्रंथांचा धांडोळा घेऊन शेतीविषयक तंत्र आणि विज्ञानाचा शोध, वाचन, अभ्यास, प्रयोग या चतु:सूत्रीच्या निकषांवर आधुनिक दृष्टिकोनातून वेध घेणारा ग्रंथ.