डॉ.बाळकृष्ण खरेएम.एस. (मूत्ररोगतज्ज्ञ); जे.जे. हॉस्पिटल व ग्रॅन्ट मेडिकल कॉलेज, मुंबई येथे शल्यचिकित्सेचे प्राध्यापक. मुंबई व इतर विद्यापीठात शल्यक्रियेतील एम.बी.बी.एस व एम.एस. परीक्षेसाठी प्रशिक्षक. स्वमूत्रोपचार या प्राचीन भारतीय उपचार पद्धतीने गेल्या पंचवीस वर्षांत हजारो रुग्णांवर उपचार. वॉटर ऑफ लाईन फाऊंडेशन, भारत या शिवांबू; अर्थात स्वमूत्रोपचार प्रसार-प्रचार करणाऱ्या संस्थेचे उपाध्यक्ष.निसर्गोपचार आणि शिवांबू उपचार या विषयातील आज भारतातीलच नव्हे-तर जगातील अधिकारी व्यक्ती. शिवांबूच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांतून निबंध सादर.स्वमूत्रोपचाराबद्दल अमेरिका, कॅनडा, जर्मनीत व्याख्याने आणि कार्यशाळा. भगवद्गीता, तीन उपनिषदे, फलज्योतिष्य आणि हस्तरेषा अभ्यासक. कर्णबधिर विद्यार्थ्यांच्या एका शाळेचे विश्वस्त.नैसर्गिक पद्धतीने चष्मा कसा घालवावा यासाठी कार्यशाळा घेतात. स्वमूत्रोपचार आणि निसर्गोपचार प्रगत करण्यासाठी ‘मेडिसिना अल्टरनेटिव्हा’ संस्थेकडून कर्मयोगी पुरस्कार.