Skip to product information
1 of 1

Shetkaryacha Aasud by Jotirao Phule

Description

जोतीराव फुले यांनी ‘शेतकऱ्याचा असूड’ हे पुस्तक १८७३ मध्येलिहिले. आज इतक्या वर्षांनंतर आणि इतर अनेक संपादने उपलब्धअसताना, त्या पुस्तकाचे आवर्जून नव्याने संपादन करण्याची गरजकाय, असा प्रश्न कोणाला पडू शकेल; पण थोडा विचार केल्यासत्या प्रश्नाचे उत्तरही सापडू शकेल. ‘असूड’ लिहिला गेला त्या वेळीदेशातील शेतकऱ्यांची जी स्थिती होती, त्यापेक्षा आजही ती मूलतःनिराळी नाही. असलीच तर ती अधिकच बिघडली आहे, हे गेल्याकाही वर्षांत दीड लाख शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्यांवरून सहजध्यानात येऊ शकेल. या देशातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रश्नआवर्जून सोडवले गेल्याखेरीज देशाला भवितव्य नाही, हे जोतीरावांचेनिदान आजही तितकेच यथार्थ आहे. तसेच ते प्रश्न सोडविण्याचीदिशा काय असू शकते, याचा जोतीरावांनी केलेला ऊहापोहआजसुद्धा मार्गदर्शक ठरणार आहे. याचा अर्थ असा, की भारतालास्वातंत्र्य मिळण्याच्या चौसष्ट वर्षांपूर्वी जोतीरावांनी या पुस्तकात जेसांगितले होते ते आज स्वातंत्र्य मिळून चौसष्ट वर्षे उलटतआल्यानंतरही तेव्हाइतकेच महत्त्वाचे आहे, एवढे एक कारणही त्यापुस्तकाचे नव्याने संपादन करण्यासाठी पुरेसे आहे.– भास्कर लक्ष्मण भोळ
Regular price
Rs. 135.00
Regular price
Rs. 150.00
Sale price
Rs. 135.00
-10%
Condition: New
Language: Marathi
Publication: Saket Publication
Shetkaryacha Aasud by Jotirao Phule
Shetkaryacha Aasud by Jotirao Phule

Recently viewed product

You may also like