शरद जोशी शेतकरी आंदोलनाचे अखिल भारतीय नेते यूनोची नोकरी सोडून ते स्विट्झरलंडहून परतले आणि त्यांनी भारतीय शेतकऱ्यांमध्ये जागृतीचा मंत्रजागर आरंभला- सभा, शिबिरं, आंदोलनं, प्रशिक्षण ... कॉलेजात शिकणारी वसुंधरा काशीकर जनसंसदेत सहभागी झाली. शिक्षणाबरोबरच तिच्या जीवनात एक आगळा अध्याय सुरू झाला- शरद जोशी नंतर सतरा वर्षांच्या सहवासात ती पाहत गेली त्यांचं कर्तृत्व ती त्यांना विचारत गेली कितीतरी प्रश्न- त्यांच्याविषयी, स्वतःविषयी, भोवतालच्या परिास्थिंतीविषयी या जिज्ञासू, संवेदनशील मुलीला त्यांनी भरभरून उत्तरं दिली. त्यातून तिला दिसलेले शरद जोशी... शेतकऱ्यांचा देव, पण एकाकी माणूस! बुद्धिवादी, अहंकारी, तरी भावनांनी ओथंबलेले, किचकट अर्थशास्त्राच्या मुळाशी भिडणारे आणि सर्व कला-वाङ्मयांवरही प्रेम करणारे मनातले विचार आचरणात उतरवून स्वतःचा आरपार शोध घेणारे शरद जोशी शोध अस्वस्थ कल्लोळाचा!