‘उद्या’ काहीच केलं जाऊ शकतं नाही, जे जे केलं जातं ते आज, आत्ता, या क्षणी! ज्या ‘उद्या’बद्दल आम्ही बोलतो तो आमच्या कल्पनेव्यतिरिक्त आणखी कुठंही नाही. कधीही नसेल. ‘उद्या’ कधी येतच नाही. येतो, तो ‘आज’ पण मन ‘उद्या’त जगतं. जे आत्ता होऊ शकतं ते मन उद्यावर ढकलतं आणि ‘उद्या’ कधीच उगवत नाही. हा उद्याचा प्रवाह, येणार्या उद्याच्या लांबच लांब कल्पनांचे थर मनावर साचत जातात. मनाचा ताण वाढवत जातात. याचा भार मोठा असतो: पण तो आपल्याला कधीच कळत नाही. ज्या ओझ्यांची आपल्याला सवय नसते. तीच ओझी आपल्याला जाणवतात. या भविष्याच्या ओझ्याची सवय आपल्याला जन्माच्या क्षणापासून होऊ लागते. म्हणून ते आपल्याला जाणवंत नाही.