शब्द ही सार्त्रची आत्मकथा. वयाच्या बाराव्या वर्षा पर्यंत चे आपले जीवन सार्त्रने या पुस्तकात रेखाटले आहे. लेखकाच्या पुढच्या वाटचालीच्या पाऊलखुणा यात बीजरूपाने दिसून येतात. ही आत्मकथा वाङ्मयीन सौंदर्याचा एक अजोड नमुना आहे. जगभरच्या सर्वसामान्य वाचकांच्या दृष्टीने या ग्रंथाला विशेष महत्त्व प्राप्त झाले, ते त्याला जाहीर झालेल्या १९६४ च्या नोबेल पारितोषिकामुळे, परंतु सार्त्र याने ते स्वीकारण्यास नकार दिला. जाँ-पॉल सार्त्र याचा अस्तीत्ववाद आणि जीवनाविषय तत्त्वचिंतन यांचेही दर्शन प्रस्तुत ग्रंथात घडते.