ब्रिटिश अमदानीत धर्मनिरपेक्ष आधुनिक लोकशाही मूल्यांचा पाठपुरावा करणारा राजा अशी महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपली स्वत:ची नवी ओळख निर्माण केली होती. बडोदे संस्थान हे युरोपीय आधुनिक प्रशासननीतीची बरोबरी करणारे प्रागतिक राज्य म्हणून ओळखले जाई. या संस्थानातील सक्तीचे प्राथमिक शिक्षण, अस्पृश्यताबंदी, स्त्री-शिक्षण व सामाजिक सुधारणा, सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा पंचायत राज्याचा प्रयोग, हे भारतातच नव्हे तर युरोपातही चर्चेचे विषय झाले होते. आंतरराष्ट्रीय शतपावली करणार्या या मराठी राजाने भारतात आणि विदेशात अनेक महत्त्वाच्या व्यासपीठांचे अध्यक्षस्थान भूषविले. त्यांनी वेळोवेळी केलेल्या भाषणांच्या या पहिल्या खंडात धर्म, शिक्षण आणि तत्त्वज्ञान या विषयावरची निवडक भाषणे संग्रहित केली आहेत.