Skip to product information
1 of 1

Sarvamangal Kshipra Baddal by Dr. Anjali Soman

Description

कै .ह .वि मोटे (१९३२ - १९८४) हे मराठीतील मनस्वी आणि ध्येयवादी असे ख्यातनाम प्रकाशक . मराठी ग्रंथव्यवहारांचा इतिहास ह . वि . मोटे ह्यांना टाळून लिहिता येणार नाही . त्या दृष्टीने ' सर्वमंगल क्षिप्रा ' हे त्यांचे आत्मचरित्र अतिशय महत्वाचे आहे . हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर ते बहुचर्चित तर झालेच , पण त्याच वेळी समकालीन पिढीतील अनेक जाणकार व मर्मज्ञ रसिकांनी आणि साहित्य - व्यवहारातील महत्वाच्या व्यक्तींनी या आत्मचरित्राच्या  निमित्ताने जो पत्र व्यवहार केला, तो सर्वसाधारण पत्र व्यवहार नसून एक सांस्कृतिक दस्तऐवजच आहे . हा दस्तऐवज डॉ. अंजली सोमण ह्यांनी आंतरिक तळमळीने आणि वाड्मयनिष्ठेने संकलित व संपादन केला आहे . त्यामुळे तत्कालीन वाड्मयीन व्यवहार समजण्यास मदत होते . पत्र व्यवहाराची मौलिकताही ह्यातून लक्षात येते .  पत्रे  बोलकी असतात ; ती भूतकाळाबद्दल बोलतात . त्यांना वर्तमानकाळाचा संदर्भ असतो आणि ती भविष्याचे विविधरंगी सूचन करतात . अर्थात यासाठी हवी वाचकांची ह्या पत्रांना दामोरे जाण्याची ताकद आणि आकलनक्षमता . वाचक ह्या पत्रांना भिडतील व त्यातील अनाहत नादांचा अनुभव घेतील ह्याची खात्री आहे .   
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Sarvamangal Kshipra Baddal by Dr. Anjali Soman
Sarvamangal Kshipra Baddal by Dr. Anjali Soman

Recently viewed product

You may also like