पालवीच्या वयोगटातील लिहिणा-वाचणारी मुले ही उद्याच्या समाजाची ‘बौद्धिक संपदा’ आहे.. त्यांना त्यांच्या अभिव्यक्तीसह मुक्तपणे बहरू देणे आवश्यक आहे. कारण ते नव्या पिढीचे ‘आत्मभान’ आहे.. गरज आहे ती त्यांच्याशी जोडून घेण्याची… आणि स्वत:ला ‘रिचार्ज’ करण्याची…जुन्या पिढीच्या साचलेपणाची कोंडी नवी पिढी फोडत असते आणि सर्जनाचा ‘झरा’ प्रवाहीत करत असते. यालाच आपण समाजाने ‘कात’टाकणे म्हणून शकतो. नव्या पिढीची ही ‘ऊर्जा’ समाजाची सर्जक ‘पालवी’ असते…जुन्यांनी नव्यांना ‘अवकाश’ देणे अपरिहार्य आहे… आपण जर हे करू शकलो तर निसर्ग आणि समाजाप्रतीची ती सर्वोत्तम कृतज्ञता ठरेल. समाजचैतन्य बहरेल… समाज ‘उर्जावान’ होईल… पालवीची ‘दखल’ ही याच प्रयत्नाचा भाग आहे…-दिनेश पाटील.