एक होता तडफदार ब्रॅरिस्टर. वल्लभभाई पटेल नावाचा. कावेबाज युक्तिवाद परजून खटले जिंकू पाहणारा. खूप पैसे कमवून झटपट श्रीमंत होऊ इच्छिणारा. पण योगायोगानं त्याची गाठ पडली एका अवलियाशी. मोहनदास करमचंद गांधींशी आणि मग चमत्कार घडला. वल्लभभाई बदलले. त्यांनी वकिली सोडली, अहिंसक सत्याग्रहाचं नेतृत्व स्वीकारलं आणि दीनदुबळया, असाहाय्य शेतक-यांचे ते तारणहार 'सरदार' बनले. 'त्या' क्रांतिकारक परिवर्तनाची ही अनोखी कथा. राष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या मूळ हिंदी कादंबरीचा हा सरस भावानुवाद.