तुकारामबावांचे चरित्रसंत तुकाराम महाराज अर्थात तुकारामबाबांचे चरित्र हे गुरुवर्य केळूसकरांनी लिहिलेले मराठीतील गद्य रूपातील पहिले विस्तृत चरित्र आहे. १८९६ साली हा ग्रंथ प्रथम प्रकाशित झाला. यानंतर आता १२० वर्षांनी तो प्रथमच पुनर्प्रकाशित होत आहे. संत चरित्रे कशी लिहावीत, हे केळूसकरांनी महाराष्ट्रास प्रथमच दाखविले आहे. सत्यनिष्ठा, चिकित्सा व माहिती पडताळून पाहणे हे या पहिल्या तुकाराम चरित्राचे वैशिष्ट्य आहे. हे लिहिताना जितका भाग ऐतिहासिक ब खरा भासला तेवढाच येथे घेतला. महाराष्ट्राचे महान संत तुकाराम महाराज यांचे मराठीतील पहिले चरित्र वाचकांसाठी प्रकाशित करीत आहोत.