ज्ञानदेवादी संतांनी लोकांपासून दुरावलेल्या अभिजनांच्या संस्कृतीचे सर्व वैभव शुद्धीकृत रूपात वारसदारांच्या हक्काने प्राप्त केले आणि त्या वैभवाचा लाभ लोकसंस्कृतीला करून दिला. याउलट लोकसंस्कृतीतील सर्व सत्वगर्भ आशयाचा, तिच्या सहजसौंदर्याचा त्यांनी नितांत जीव्हाळ्याने शोधपूर्वक स्वीकार स्वीकार केला आणि अभिजनांच्या संस्कृतीला लोकसंस्कृतीचे केवढ लक्षणीय योगदान असू शकते , याचा अनुभव आपल्या साहित्यातून दिला.प्रस्तुत ग्रंथात संतांच्या असाधारण प्रभावाचे रहस्यवेध शोधक पप्रतिभेने घेतला आहे.