डॉ. भाऊसाहेब कोलते यांच्या जीवितकार्याला त्यांच्या व्यासंगाचा, निदिध्यासाचा, आस्थेचा आणि लक्षणीय कर्तृत्वाचा स्पर्श जिथे जिथे झाला त्या सर्व आघाड्यांवर कार्यरत असलेल्या तज्ज्ञ जाणकारांनी लिहिलेल्या शोधनिबंधांचे साक्षेपी संकलन करून अभिवादन करण्याच्या भूमिकेतून साकार झालेल्या संशोधनाची क्षितिजे या गौरवग्रंथाची ही दुसरी आवृत्ती. भाऊसाहेबांनी संशोधनार्थ हाताळलेल्या विषयांचा आवाका मोठा असला तरी मुख्यत्वे महानुभाव साहित्याचे संशोधन, मराठी भाषा, साहित्य व संस्कृती, प्राचीन भारतीय इतिहास व पुरातत्त्व; आणि शिक्षण व अध्यापन हे चार त्यांचे कायम आस्था विषय होते. या चारही क्षेत्रांतील नव्या क्षितिजांचा वेध घेणारे लेखन या ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे.