'कुणाची मानेच्या दुखण्याची तक्रार, तर कुणाची कंबरेची, हातापायाची बोटं सुजणं, गुडघा आखडणं, सर्वांग दुखणं - अशा सांध्यांच्या तक्रारी तर आजूबाजूला फारच ऐकायला येतात. पण संधिवात म्हणजे काय? सांध्यांच्या तक्रारींवर नेमका उपाय काय? हा उपाय कोण करू शकतं? त्यासाठी वेगळे विशेषतज्ज्ञ डॉक्टर असतात का? ही माहिती सामान्यांपर्यंत सहजी पोहोचतच नाही. आवश्यक आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठीच क्या फाउन्डेशन या संस्थेतर्फे जनजागृती आणि प्रशिक्षणाचं कार्य सुरू झालं. डॉ. श्रीकान्त वाघ हे संधिवाताचे विशेषतज्ज्ञ. त्यांनी लिहिलेलं, संधिवाताविषयी संपूर्ण शास्त्रीय माहिती देणारं, मराठी आणि इतर भारतीय भाषांतलं हे पहिलंच पुस्तक संस्थेनं वाचकांसमोर आणलं आहे. '