एकोणिसाव्या शतकातील व्हिक्टोरिया राज आणि तत्कालीन भारतीय राजकारण व समाजकारणातील परस्परसंबंध उलगडून दाखवण्याचं काम माइल्स टेलर यांचं हे पुस्तक करतं. भारतातील लढायांमधून लुटलेला माल असो, राणीच्या दरबारातील खास भारतीय सैनिक असोत वा राणीच्या भेटीस गेलेल्या तत्कालीन राजेरजवाडे असोत, सम्राज्ञी व्हिक्टोरियाची भारतासोबतची जवळीक यातून स्पष्ट होते. राणी व्हिक्टोरिया तिच्या आयुष्याच्या अखेरच्या दशकातच नव्हे, तर संपूर्ण कारकिर्दीत भारतीय समाजाशी जोडलेली होती, याची सोदाहरण मांडणी या पुस्तकात अनुभवास येते.