Skip to product information
1 of 1

Samikshapaddhati: Siddhant Aani Upayojan by Ravindra Thakur

Description

साहित्याचे आकलन आणि आस्वाद यासाठी समीक्षापद्धतींची आवश्यकता नसली तरी साहित्यकृतींच्या विश्लेषणासाठी आणि मूल्यांकनासाठी समीक्षापद्धतींची आवश्यकता असते. हे निर्विवाद. एवढेच नव्हे तर साहित्यकृतींच्या विश्लेषणाला आणि मूल्यांकनाला वस्तुनिष्ठतेचे परिमाण लाभण्यासाठी अशी चिकित्सा आवश्यक ठरते. मराठी साहित्यक्षेत्रात आज अनेक समीक्षापद्धती प्रचलित आहेत. त्यांचे उपयोजनही केले जाताना दिसते. तथापि काही वेळा त्यांच्या उपयोजनाविषयी संभ्रम दिसून येतो. त्या त्या समीक्षापद्धतींची सैद्धांतिक भूमिका पुरेशी स्पष्ट नसणे हे त्याचे एक कारण असू शकते. तसेच त्यांच्या उपयोजनाची प्रमाणके उपलब्ध नसणे हेही असू शकते. म्हणूनच नवोदित अभ्यासकांना विविध समीक्षापद्धतींची यथायोग्य ओळख व्हावी आणि सोबतच त्यांच्या उपयोजनाविषयी सुयोग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागात एक व्यापक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. प्रा. म. द. हातकनंगलेकर, डॉ. के. रं. शिरवाडकर, डॉ. निशिकांत मिरजकर, डॉ. रमेश धोंगडे, डॉ. अश्विनी धोंगडे, डॉ. हरिश्चंद्र थोरात, डॉ. मंगला आठलेकर अशा अनेक मान्यवरांनी या चर्चासत्रात विविध समीक्षापद्धतींची ओळख करून देणारे निबंध वाचले होते. विविध समीक्षापद्धतींविषयी डोळस भान देणाऱ्या ह्या निबंधांचे हे संपादन भावी अभ्यासकांना दिशादर्शक ठरेल, असा विश्वास वाटतो.
Regular price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Sale price
Rs. 180.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Publication: Padmagandha Publication
Samikshapaddhati: Siddhant Aani Upayojan by Ravindra Thakur
Samikshapaddhati: Siddhant Aani Upayojan by Ravindra Thakur

Recently viewed product

You may also like