कॉम्प्युटर, इंटरनेट, त्यानंतर आलेला स्मार्टफोन व ह्या तिघांचे जमलेले त्रिकूट ह्यासारख्या घटकांमुळे महानगरांपासून खेड्यांपर्यंत सर्वांच्याच जीवनात फरक पडला. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे १९७०) गेल्या ४७ वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन होय. ह्याबाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना हॅण्डसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला
आहे. आज जगाच्या सात आब्ज लोकसंख्येपैकी ३४% लोक इंटरनेट वापरतात. आज आपल्याकडे ५० कोटी
सेलफोनधारक आहेत आणि त्यांची संख्या दरमहा ५० ते ६० लाखानी वाढते आहे. भारतात आपण ह्या क्षेत्रामध्ये होणारी फार मोठी परिवर्तने पाहात आहोत, मोबाईल हे उपकरण २००० च्या दशकात जास्त प्रभावी झाले. आता तर त्यात अनेक करिअर संधी सुद्धा उपलब्ध आहेत. लॉकडाउनच्या काळात फोन ही आपली जीवनवाहिनी (लाइफलाईन) ठरली होती. हे उपकरण कार्य करण्यास जरुर वापरा. पण अतिवापर टाळा. त्याच्या अधिन होऊ नका व त्याचा सकारात्मक माफक वापर करा.