शब्दांचा संग्रह शब्दकोशांत केलेला असतो. त्यातूनच सम-शब्द- कोश (Dictionary of Synonyms) तयार केलेला असतो. या धर्तीवरच पण सम विषयांस जमणारे शब्द एकत्रित करून त्यांचा एककोश करतात. त्याला 'पर्यायी शब्द-कोश' (Thesaurus) अशी संज्ञा दिली जाते. यालाच 'शब्द- -कौमुदी' हा शब्द वापरला आहे. कळ आहेत. या कोशाची रचना करतांना केवळ सदृश शब्दावरच थांबता संलग्न व जुळणाऱ्या अशा कल्पना व वाक्प्रचार शब्दाबरोबरच घेतले आहेत. मराठी भाषेची जडणघडण पाहता त्यातील दोनतीन शब्द गुंफून अथवा एखादी कल्पना घेऊन निर्माण होणारे वाक्प्रचार बाजूला काढले तर राहणारे पर्यायी शब्द तितकेसे उपयोगी ठरणार नाहीत असे वाटल्यावरून अशा तऱ्हेचा संमिश्र स्वरूपाचा हा कोश तयार केला आहे. अखेर विश्याय.. योग्य, समर्पक व अर्थवाही शब्दनाणी जमा करून ती कुशलतेने वापरणे म्हणजेच यशस्वी लेखनकला. मराठीमध्ये लेखन करणाऱ्या अनेकांना या कोशाचा उपयोग होईल असा विश्वास वाटतो.