“रूढ विक्रीतंत्रांमध्ये आमूलाग्र बदल करत रिटेल बिझनेसचा चेहरामोहरा बदलणारा क्रांतिकारी उद्योजकसॅम वॉल्टन…वॉलमार्टचा प्रणेता…साधारण सात दशकांपूर्वी, मॉल हा शब्दही बहुधा अस्तित्वात नव्हता तेव्हा वॉलमार्टची स्थापना करून सॅमने रिटेल व्यवसायाच्या क्षेत्रात क्रांती केली. तत्कालीन कंपन्या ज्यावेळी ग्राहकांना मोठ्या सवलतीच्या दरांत वस्तूंची विक्री करण्यास धजावत नव्हत्या त्यावेळी सॅमने थेट उत्पादनकर्त्यांकडून ठोक भावात मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करून तो फायदा ग्राहकांच्या खिशात सरकवला.…आणि हाच त्याच्या भव्य जागतिक यशाचा मास्टरस्ट्रोक ठरला.आज जगभरात वॉलमार्टची १०,००० हून अधिक स्टोअर्स असून ही एक सर्वोच्च दर्जाची सेवा पुरवणारी ग्राहककेंद्रित कंपनी म्हणून ओळखली जाते.जगाच्या नकाशावर स्वतःचं इतकं ठळक स्थान निर्माण करण्यामागे दडली आहेत सॅमची असंख्य तत्त्वं…त्याच तत्वांचा वेध घेत वॉलमार्टच्या स्टोअरची संस्कृती उलगडणारं हे अनोखं पुस्तक…”