"सूर्यप्रकाशात दिमाखाने तळपणाऱ्या सोनेरी कळसाला मंदिराच्या पायात | गाडल्या गेलेल्या दगडांचे विस्मरण व्हावे हे स्वाभाविक असले तरी सुसंस्कृतपणाचे लक्षण खासच नव्हे! फळाफुलांनी डवरलेल्या वृक्षाच्या फांद्याना मातीत पसरलेल्या मुळ्यांचे मोल करता येऊ नये यापुरता दैवदुर्विलास तो कोणता? स्वातंत्र्यासाठी आत्मसमर्पण करणाऱ्या हतात्म्यांच्या त्यागाची शासकांना कदर करता येऊ नये यासारखे दुर्दैव ते कोणते?" माधव पिटके यांच्या साक्षीदार' या कथासंग्रहातून हीच भावना व्यक्त झालेली आहे. हा कथासंग्रह स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतीला अभिवादनच आहे!