'भावगीत म्हणजे मराठी माणसाचं सांस्कृतिक वैभव. स्त्रीगीताचा मातृस्वर, संतवाणीची आर्तता, संस्कृत काव्याचा शृंगार, पंडिती-शाहिरी काव्याचे नवरस असं सारं लाभलेलं हे त्याचं `स्व-गीत आहे. या भावगीताला संगीत रंगभूमीचं ऐश्वर्य आहे, तसंच मराठमोळं साधेपणही आहे. `रानारानात गेली बाई शीळ, `माझिया माहेरा जा, `गगनी उगवला सायंतारा, `शुक्रतारा मंदवारा, `आज अचानक गाठ पडे, `शब्दावाचून कळले सारे, `गंगाजमुना डोळ्यात उभ्या का, `तरूण आहे रात्र अजुनी, `चांदण्या रात्रीतले ते स्वप्न तू विसरून जा, `विसरशील खास मला... मराठी माणसासाठी जणू त्याच्या भावजीवनाच्या प्रत्येक क्षणाकरिता एकेक भावगीत उमललेलं आहे... शब्दसुरांच्या अदभुत प्रवासाचा हा भावनिक, सांस्कृतिक आठव...'