डॉ. स. रा. गाडगीळ हे मराठीतील ज्येष्ठ नामवंत समीक्षक.भारतीय व पाश्चिमात्य साहित्याचे अभ्यासक म्हणून त्यांची आपणास ओळख आहे.
प्रस्तुत ग्रंथात डॉ. गाडगीळ यांनी सुखात्मिका, शोकात्मिका, कॅथार्सिस, आधुनिक काव्यविचार, साहित्यशास्त्रातील साधारणीकरणाचा सिद्धान्त यांची विस्तृत चर्चा केली आहे. प्राचीन भारतीय समाजव्यवस्थेपासून ते आजपर्यंतच्या समाजव्यवस्थेची ऐतिहासिक व वाङ्मयीन दृष्टिकोनही त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण लेखांत मांडला आहे. स्त्रीप्रधान समाजव्यवस्था, बौद्धधर्म, मानववंशशास्त्र, मधुराभक्ती अशा काही महत्वपूर्ण विषयांची सखोल चर्चा करणारे लेख अभ्यासकांना उपयुक्त ठरणारे आहेत.