Skip to product information
1 of 1

Sahakardhureen By Arun Sadhu

Description

भारतातील दीनदुबळया शेतकऱ्यांना कायम स्मरणात राहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना सहकाराचा मंत्र देऊन त्यांना दारिद्रय आणि अज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला. पिळवणूक करणारे सावकार, धनदांडगे व्यापारी, राज्यसत्तेचे लबाड प्रतिनिधी, जातिभेद, वर्गविग्रह यांसारख्या बलाढय शत्रूंशी अहिंसक मार्गाने लढण्यासाठी त्यांनी अर्धपोटी भूमिपुत्रांची सेना संघटित करून त्यांचं यशस्वी नेतृत्व केलं… आणि त्यांच्याच सहभागाने ‘प्रवरा सहकारी साखर कारखाना’ हा भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना १९५० मध्ये उभारला.कारखान्याच्या उभारणीसोबतच विठ्ठलरावांनी समाजविकास व शिक्षणप्रसाराच्या कार्याला चालना दिली आणि त्यामुळेच सहकारी कारखाना म्हणजे क्रांतिकारक बदलाचं प्रारूप ठरलं. त्याचं लोण केवळ पश्चिम महाराष्ट्रात पसरलं असं नाही, तर त्यामुळे अवघ्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक व राजकीय चित्र बदललं. या प्रक्रियेत त्यांच्या सहकारी कारखान्याने उत्प्रेरकाची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी चळवळीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला शेती-शक्तीचा आधार देण्यामध्ये विठ्ठलरावांचं योगदान मोठं ठरलं आणि त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘सहकारधुरीण’ ठरतात.विठ्ठलरावांच्या जीवनाच्या व कार्याच्या विविध टप्प्यांबाबत प्रदीर्घ काळ संशोधन करून सिध्द केलेला हा समग्र चरित्रग्रंथ ‘सहकारधुरीण’ महाराष्ट्राच्या सामाजिक प्रश्नांबाबत अंतर्दृष्टी देणारा ठरावा.
Regular price
Rs. 340.00
Regular price
Sale price
Rs. 340.00
-0%
Condition: New
Language: Marathi
Publicaion: Rohan Prakashan
Sahakardhureen by Arun Sadhu
Sahakardhureen By Arun Sadhu

Recently viewed product

You may also like