"माझ्या मागून तिने येण्याऐवजी मी तिच्या मागून निघालो.. योग्य दिशेने, योग्य स्थळी तिने मला पोचवले माझे अवगुण तिने पचवले. माझ्या गुणांचे तोलून मापून कौतुक केले... वास्तवाचा विसर पडू दिला नाही सौ. सुलभा दुःखाने कधी खचली नाही. संकटात कधी डगमगली नाही. ती फार धीराने, संयमाने वागली. मुळचीच ती समाधानी होती. एखाद्या गोष्टीची खंत करायचे तिला ठाऊक नव्हते. सद्भाव तिचा पिंड होता. दुसऱ्याचे चांगले बघण्यात तिला आनंद होता. अशी सहचरी मिळणे खरोखरच भाग्याचे. म्हणून मी स्वतःला भाग्यवान समजतो."