आयएनएसव्ही ‘म्हादेई’ या शिडाच्या बोटीतून एकट्याने पृथ्वीप्रदक्षिणा करणारे कमांडर दिलिप दोंदे हे अशा प्रकारची पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले भारतीय ठरले. ‘सागरी परिक्रमेचा पराक्रम’ या पुस्तकात त्यांचा पाच वर्षांतील प्रवास व प्रगती त्यांच्याच शब्दांत मांडण्यात आली आहे. अनेक अडथळे आणि संकटांना तोंड देत त्यांनी पृथ्वीप्रदक्षिणा कशी पूर्ण केली, याचे अत्यंत रोचक वर्णन त्यांनी केले आहे. विपरीत परिस्थितीचा सामना करताना एका माणसाने आपली स्वप्ने कशी साध्य केली, याची गुंगवून टाकणारी ही कहाणी एक साहसयात्रा तर आहेच, पण त्याबरोबर स्वतःवरच्या अटळ विश्वासाची विजयगाथाही आहे.