अहंकारानं वेढलेल्या निशिकांतला खऱ्या कलेची ओळख करून देणारी – ‘भैरवी’ प्रेमासाठी यल्लूबाईचा कोप... ‘जटांपासून’ मुक्त होऊ पाहणारी – ‘रेणुका’ आईसाठी, घरासाठी... घराच्या रेषेवर घट्ट पाऊल जखडूनही ‘आऊट’ होणारी – ‘मिनी’ माहेर आणि सासरचीही फक्त एक ‘रिकामी जागा’ भरून काढण्याचं साधन बनलेली – ‘सरला’ परागंदा झालेल्या पतीमुळे बेवारशी झालेल्या... तरीही पतीचं सारं ‘तर्पण’ पार पाडणाऱ्या – ‘सुधाताई’ काळ्या कातळ्यासारख्या नियतीसमोर हार न मानताना ‘घराची चौथी भिंत’ उभी करणाऱ्या – ‘आक्का’ नियतीच्या या अगाध खेळातही जीवनावर निस्सीम प्रेम करणाऱ्या या स्त्रिया म्हणजे, जणू लेखिकेच्या मनाचा आरसाच... यात उमटलेलं प्रत्येक प्रतिबिंब... आपल्या श्रांत मनाला दिलासा देऊन जातं!