सर्वसाधारण जीवनव्यवहारात आपण ‘वाक्य’ वापरतो. वाक्य व्याकरणाच्या नियमांनी आणि सामाजिक संकेतांनी अर्थबोध घडवल्याचा आभास निर्माण करते, या उलट कबिरांचं काव्य. ‘काव्य’ ‘शब्द’ ‘वाक्य’ शब्दाचा नुसताच वर्णविपर्यय नसून वाक्याच्या मर्यादांपलीकडील अमर्याद असं जे सतत मोहविणारं, खुणावणारं, हुलकावण्या देणारं सौंदर्य म्हणा; परमतत्त्व म्हणा; प्रेम म्हणा - आहे; त्याचा क्षणकाल तरी प्रत्यय घडवणारं जे असतं, त्याचा निदर्शक आहे. राम-अमलांत बेदरकार होऊन ‘स्व’चा शोध घेणारे कबीर, आपापल्या आयुष्यातीलराम शोधण्यासाठी आपणा सर्वांनाच प्रेरक-मार्गदर्शक ठरतील, अशा भावनेपोटी अनुवादिकेने कबिरांच्या साखींचा हा मराठी अनुवाद केला आहे.