अमृता प्रीतम या पंजाबी व हिंदी भाषेत लिहिणा-या श्रेष्ठ लेखिका होत्या. सहा दशकांच्या दीर्घ लेखन कारकीर्दीत त्यांनी शंभरहून अधिक पुस्तके लिहिली. त्यामध्ये कविता, कादंबरी, चरित्र, कथा आणि निबंध हे वाड्.मयप्रकार समर्थपणे हाताळले. नागमणि, अज्ञात का निमंत्रण अशा त्यांच्या अनेक पुस्तकांची अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत.