1925 साली स्थापना झाल्यापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना कायम चर्चेत राहिलेली आहे. संघासंबंधी बरेच समज/गैरसमज राहिलेले आहेत. यापैकी काही जाणीवपूर्वक पसरवण्यात आले आहेत. तथापि, ज्या प्रमाणात रा. स्व. संघासंबंधी अनुकूल/प्रतिकूल मते मांडली जातात त्या प्रमाणात रा. स्व. संघासंबंधी आणि त्याच्या कार्यपद्धतीविषयी वस्तुनिष्ठ विवेचन करणारी पुस्तके उपलब्ध नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रकारच्या वर्णनात्मक शैलीतील विवेचनाचा प्रयत्न दिल्लीतील पत्रकार आणि माध्यमकर्मी श्री. अरुण आनंद यांनी आपल्या ’ख्हदै ंदल्ू एए’ या पुस्तकाद्धारे केला आहे. या पुस्तकाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील भूतपूर्व इंग्रजी विभागप्रमुख आणि सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. सतीश देशपांडे यांनी केलेला हा मराठी अनुवाद.