Skip to product information
1 of 1

Ranu Aani Bhanu by Sunil Gangopadhyay

Description

कवी रवींद्रनाथांना भारतभरातून रोज शेकडो पत्रे यायची. एके दिवशी पत्र मिळाल्यावर कवींना खूप कौतुक वाटले. ते पत्र वाराणसीतील राणू नावाच्या छोट्या मुलीने लिहिले होते. या वयात तिने कवींचे बरेच साहित्य वाचले होते. ते तिच्या जिव्हाळ्याची व्यक्ती बनले होते. आजकाल कवी इतक्या कमी कथा का लिहितात, अशी तिची तक्रार होती. त्या मुलीच्या प्रत्येक पत्राला कवींनी उत्तर दिले.कलाक्षेत्रात लोकप्रिय असलेल्या रवींद्रनाथांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मात्र स्वास्थ्य लाभले नाही. अशातच अचानक एके दिवशी कवींची लाडकी मोठी मुलगी माधुरीलता हिचे दीर्घ आजाराने निधन झाले. कवी मनोमन कोसळले. त्याच दिवशी अस्वस्थ मनाने ते भवानीपूरला पोचले. एका घरासमोर थांबून हाक मारली - राणू! राणू!साद ऐकून एक मुलगी पटकन खाली आली. कवी तिच्याकडे बघतच राहिले. ते कोणाकडे पाहत होते? ती देवदूत होती की स्वर्गातील अप्सरा?त्याच दिवशी त्या मुलीचे आणि अठ्ठावन्न वर्षांच्या कवींचे अनोखे नाते निर्माण झाले. राणू कवींच्या खेळाची सोबती झाली, नवनिर्मितीची प्रेरणा, त्यांनी गमावलेली त्यांची ‘वहिनी’ झाली आणि कवी राणूसाठी तिचा लाडका भानुदादा झाले.कवी चीनच्या दौर्‍यावर असताना राणूचे लग्न निश्चित झाले. राणू आता वीरेन मुखर्जींची पत्नी आणि दोन मुलांची आई झाली.कवी आता वृद्ध झाले होते. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत राणूकडून त्यांना काय मिळाले? ती फक्त ‘अश्रूतील दुःखाचे सौंदर्य’ होऊन राहिली आहे का?सुनील गंगोपाध्याय यांच्या लेखणीतून साकारलेली अभिनव आणि अतुलनीय कादंबरी.राणू आणि भानु  ।  सुनील गंगोपाध्याय  अनुवाद : मृणालिनी केळकर  ।  पद्मगंधा प्रकाशन
Regular price
Rs. 270.00
Regular price
Rs. 300.00
Sale price
Rs. 270.00
-10%
Condition: New
Languge: Marathi
Pulication: Padmagandha Prakashan
Ranu Aani Bhanu by Sunil Gangopadhyay
Ranu Aani Bhanu by Sunil Gangopadhyay

Recently viewed product

You may also like