सुप्रसिद्व ग्रामीण साहित्यिक डॉ. आनंद यादव यांचा हा बालगीतांचा संग्रह. शिक्षणाच्या निमित्ताने आपलं आतड्याचं खेडं सोडतानाच्या आणि सोडल्यानंतरच्या मुक वेदना इथे शब्दरुप घेऊन येतात. आईची माया, भावंडांचं प्रेम, मित्रांचा जिव्हाळा, इतकेच काय परंतु मुक पशू-पक्ष्यांचा लळा यांच्या आठवणीने कवी व्याकुळ होतो. खेड्यातल्या मातीतून खोलवर पसरलेली मुळं परिस्थितिशरणतेमुळे सोडवून घेतानाचे अस्वस्थ अनुभव देणार्या या कविता सर्वच थरांतील वाचकांना अंतर्मुख करतील.