सोंगाड्या हे तमाशातील अतिशय महत्त्वाचे पात्र आहे, कथेतून, देहबोलीतून, हजरजबाबीपणातून उत्स्फूर्त व चातुर्यपूर्ण संवादातून तो मराठी प्रेक्षकांना हसविण्याचे काम करत आला आहे. प्रस्तुत पुस्तकात गौळणीपासून वगापर्यंत सोंगाड्याच्या विविध स्वरूपांतील आविष्कारांची नोंद घेत अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे. लोकसाहित्याविषयी सातत्याने लेखन करणारे श्री. सोपान खुडे यांनी ह्या पुस्तकाद्वारे सोंगाड्याची रांगडी गंमत अतिशय रंजक व शोधवृत्तीने केली आहे.