‘ताई, एक इचारू!’‘विचार’आम्ही पिढीजात लावणी कलाकार. लावणी आमी तगविली. लावणी आमी जगविली. मातर आता व्हतंय आसं की, टिव्हीवर म्हना, अगर सिनेमात म्हना, चांगल्या घरच्या सिकलेल्या पोरी लावण्यावर नाचायल्यात. टिव्हीवाले, सिनेमावाले आमाला फुकटबी इचारीना झालेत. हे बरं हाय म्हना की.“असं नाही म्हणता येत केतकी. अमुक एक माझा पिढीजात व्यवसाय आहे. म्हणून तो माझ्याशिवाय अन्य कुणीही करू नये, असं कसं म्हणता येईल? सध्या जागतिकीकरणाचा काळ आहे, हे आपल्याला कसं विसरता येईल.”“म्हंजी आमी आसंच सांदी कोपऱ्यात पडून हायचं म्हना की.”“तसं मुळीच नाही – कनातीतली लावणी तमाश्या थिएटरमध्ये आली, सध्या तर ती नाट्यगृहामध्ये आलेली आहे. नाटकवाल्यांना प्रेक्षकांची वाट बघावी लागत आहे, तर लावणीनृत्याचे कार्यक्रम हाऊसफुल जात आहेत, हे आपल्याला विसरून कसं चालंल?राजसा : एका पिढीजात लावणी नृत्यांगनेची संघर्षमय कथा.