डॉ. छाया महाजन ह्या संवेदनशील लेखिकेचा हा कथासंग्रह. मानवी जीवनातील अनाकलनीयता, बदलत्या जीवनशैलीचामानवी संबंधांवर झालेला परिणाम या कथांतून व्यक्त होतो. आजच्या जगाची ही कथा सार्वकालीन आहे.
आयुष्यातील अतर्क्य शक्यतांचा प्रवास ह्या कथा वाचताना वाचकाला घडतो. समाज, कुटुंब आणि जीवनपद्धतीच्या तिहेरी गोफात बांधलेल्या ह्या कथा कधी मन पिळवटून टाकतात, कधी खिन्न करतात, कधी समाधानी देतात, कधी त्या वाचकाला उत्कटही बनवतात. अशा बहुपदरी कथांचा हा संग्रह सर्वांना आवडेलच. स्त्री-लेखिकांच्या कथांचा अभ्यास करणार्या अभ्यासकांचेही तो लक्ष वेधून घेईल यात शंका नाही.