हिंदी चित्रपटसृष्टीचा अर्थात चित्रपटगीतांचा सुवर्णकाळ…
या कालखंडावर आपली नावं सुवर्णाक्षरांनी कोरणारे संगीतकार कोणते?प्रत्येक संगीतकाराचा बाज वेगळा कसा? त्याची वैशिष्ट्यं कोणती?त्यांची अजरामर गाणी कोणती?त्या गाण्यांच्या चालींची, ऑर्केस्ट्रेशनची वैशिष्ट्यं कोणती?त्यातील हरकतींचं, केलेल्या प्रयोगांचं महत्त्व काय?त्यांतील कोणत्या जागा म्हणजे त्या गाण्यांची सौंदर्यस्थळं म्हणता येतील?एकंदर सांगायचं तर, ही गाणी आपल्यावर४०-५०-६० वर्षं कसं काय गारूड करू शकतातहे नेमकेपणे सांगून, रसिकतेने केलेलं विश्लेषण म्हणजेच…हिंदी चित्रपट संगीताच्या मर्मज्ञमृदुला दाढे-जोशी लिखित एक आस्वादात्मक पुस्तकरहें ना रहें हम…