इजिप्त म्हणजे साडेचार हजार वर्षांची प्राचीन संस्कृती. इजिप्त म्हणजे फारोह, नाईल, ममीज् अन् अवाढव्य मंदिरे. पण या सर्वांहून ठळक वैशिष्ट्य म्हणजे इजिप्तचे पिरॅमिड. प्राचीन जगातील आश्चर्यांपैकी आधुनिक जगापर्यंत पोहोचलेले एकमेव आश्चर्य म्हणजे इजिप्तचे हे पिरॅमिड. या प्राचीन संस्कृतीच्या अवशेषांचे, वास्तूंचे अन् प्रतीकांचे वेधक दर्शन घ्यायचे असेल, तर चला जाऊ सफरीला –