भारतात, महाराष्ट्रात १८५७ मध्ये पुनरुत्थान युगाची सुरुवात झाली. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांच्या बरोबरच माधवराव रानडे यांनी ही चळवळ उचलून धरली. सामाजिक सुधारणेला त्यांनी महत्व दिले. विधवा विवाह, बालविवाह प्रतिबंध व अन्य रुढींना त्यांनी विरोध केला. स्त्री शिक्षणाला महत्व देत त्यांनी आपली पत्नी रमाबाई रानडे यांना स्वतः शिक्षणाचे धडे दिले. मुलांबरोबर मुलींच्या स्वावलंबनासाठी त्यांनी प्रयत्न केले. पहिले भारतीय अर्थशास्त्रज्ञ म्हणूनही त्यांची ओळख सांगितली जाते. त्यांच्या समाज व देशकार्याचा आढावा ह. अ. भावे यांनी 'न्यायमूर्ती म. गो. तथा माधवराव रानडे' या चरित्रात घेतला आहे.