मानवानं निसर्गाच्या विरोधात युद्ध पुकारलं आहे. आणि हे आत्मघातकी आहे. प्रक्षुब्द्ध झालेला निसर्ग निकरानं परतीचा प्रबळ हल्ला करत आहे. पाणथळ जागा संपत चालल्या असून वाळवंटं वाढत आहेत. अरण्यतोड थांबत नाही. जैवविविधता कोसळत आहे. दहा लाख प्रजाती समूळ उच्चाटनाच्या धोक्यात आहेत. सर्व महासागर प्लॅस्टिकने तुंबून जात आहेत. आपल्या डोळ्यांदेखत पर्यावरणीय यंत्रणा नष्ट होत आहेत. सध्या जग कडेलोटाच्या बिंदूवर येऊन ठेपलं आहे. सध्या चालू असलेल्या ह्या बहुविध अराजकाला मानवी कृत्येच जबाबदार आहेत. याचा अर्थ मानवी कृतीच त्यांना रोखू शकते. आणि त्यासाठी हे दशक निर्णायक ठरणार आहे. माणसाने चालवलेले अनन्वित अत्याचार झेलणाऱ्या सहनशील धरतीकडून मिळालेला निर्वाणीचा इशारा..