मिशन नेपाल भारताच्या एक्स्टर्नल इंटेलिजन्स एजन्सीच्या ईस्टर्न सर्व्हिस ब्युरोचे प्रमुख जीवनाथन यांच्यावर एजन्सी हेडक्वार्टर्सने हा ब्युरो बंद करण्याचं काम सोपवलंय. प्रामुख्याने नेपाळ, आणि भारताच्या पूर्वेच्या अन्य शेजारी देशांच्या संदर्भात इंटेलिजन्स गोळा करणं, ऑपरेशन्स चालवणं असं या ब्युरोचं काम, परंतु बराच काळ त्यांच्याकडून फारशी उपयुक्त माहिती हाती आली नसल्याने या ब्युरोवर अधिक खर्च करत राहणं हेडक्वार्टर्सला मान्य नव्हतं. या परिस्थितीकडे जीवनाथन ब्युरोचं पुनरुज्जीवन करण्याची एक संधी म्हणून पाहतो आणि एकापाठोपाठ एक बेधडक ऑपरेशन्स आखतो… ही ऑपरेशन्स त्याचा ब्युरो वाचवू शकेल? नेपाळ आणि भारत यांचे संबंध सुधारतील?
थरारक आणि स्वानुभवातून उतरलेल्या इंटेलिजन्स क्षेत्रातील खिळवून ठेवणाऱ्या दोन कथा…
मिशन नेपाळ आणि द वॉक इन !