आपल्या जीवनात विकास करण्याचा एखाद्याने निश्चय केला तर त्याला कुणी अडवू शकत नाही. त्यासाठी दृढ निश्चय आणि आत्मविश्वासाच्या बरोबरीने सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता असते. मोठ्यात मोठी किंवा कितीही अवघड समस्या समोर आली, तरीही तिच्याशी संघर्ष करून तिचा निःपात करण्यासाठी नेहमी तयार राहा. मग बघा विकासाच्या रहस्यावरील पडदे आपोआप दूर होतात आणि मग तुम्ही अत्यंत वेगाने पुढेच जात राहता.– खूप परिश्रम करा, चांगल्या सवयी लावून घ्या, –प्रामाणिकपणाने वागा, छोट्या-छोट्या बाबींची बारकाईने चौकशी करा, निर्णय घेण्याची क्षमता वृद्धिंगत करा, आपल्या ध्येयावर निष्ठा ठेवा. हे सारे गुण तुम्ही अंगीकारले तर खरोखरच तुम्ही पोलादी पुरुष व्हाल आणि प्रगती अशाच व्यक्तीच्या पायाशी लोळण घेत असते.