मराठी साहित्यात गेल्या अर्धशतकात अनेक साहित्यप्रवाह उदयाला आले. आशय आणि अभिव्य.तीच्या वेगळेपणामुळे ह्या साहित्याची निरनिराळ्या पद्धतीने चर्चा झाली.
प्रस्थापित समीक्षेला आणि अभिरुचीला एक प्रकारे ह्या साहित्यप्रवाहाने आव्हान दिले.
साहित्यप्रवाहाबरोबरच प्रवाहातील लेखकदेखील महत्त्वाचा घटक असतो. त्याच्या साहित्यकृतीमुळे प्रवाह समृद्ध होत असतो.
लेखक, त्याचे सैद्धांतिक विवेचन, त्याची साहित्यकृती, ती साहित्यकृती ज्या वाङ्मय प्रकाराशी संबंधित आहे तो वाङ्मयप्रकार, समकालीन,सामाजिक आणि वाङ्मयीन पर्यावरण अशा अनेक गोष्टी साहित्य प्रवाहाला ऊर्जा देत असतात, वृद्धिंगत करीत असतात, हा दृष्टिकोन समोर ठेवून‘परिवर्तनाचे प्रवाह’ ह्या ग्रंथातील सैद्धांतिक चर्चा आणि साहित्यकृतींची चिकित्सा केली आहे.
वेगवेगळ्या निमित्ताने लिहिलेले हे लेख परिवर्तनाचे प्रवाह अधिक स्पष्ट करत जातात, हेच या पुस्तकाचे वेगळेपण आहे.