ओव्हरलोडऑर्थर हेली यांची विजेचा धक्का देणारी कादंबरी सर्व भावभावनांनी ओथंबलेली, एका निर्णायक टप्प्यावर आलेल्या अमेरिकन उद्योगर्धक्याच्या जबरदस्त धाडस आणि विस्फोटक रहस्यांनी भरगच्च असलेली एक महत्त्वाची कादंबरी !देशातील एक भलामोठा ऊर्जा निर्मिती करणारा उद्योग समूह जेव्हा प्रचंड भावना विकारांनी आणि रहस्यांनी थरारून जातो तेव्हा ही घटना घडते. जेव्हा निसर्गाची हळूवारपणे सरपटत येणारी शक्ती आणि माणसांचे विघातक वेड हातात हात घालून अडथळा तयार करते, तेव्हा गोल्डन स्टेट पॉवर अॅण्ड लाईट उद्योगसमूहाचे काय होणार हा विचार हजारोंच्या जीवनमरणाचा प्रश्न बनून जातो. आत्यंतिक वास्तव आणि संभाव्यता रक्त गोठवून टाकते. ओव्हरलोड ही कादंबरी आपल्याला एका अतिरेकी संकटाची सूचनाच देते... प्रकाश आणि ऊर्जेविरहित जगाची... जे आता फक्त क्षणाच्या अंतरावर आहे."ऑर्थर हेलीला माणसाचा अंतरंग गवसला आहे.... हॅलीची कुठलीही कादंबरी वाचून संपल्यावर वाचक... किमान त्या विषयातला तज्ञ बनतो...' न्यूज डे " -